Bachchu Kadu Saam Tv
Video

Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाचा फटका, समृद्धी माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी| VIDEO

Samruddhi Mahamarg : बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर हजारो गाड्या अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपुरात समृद्धी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.समृद्धी महामार्गावर हजारो गाड्या अडकून पडल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूं यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं होते. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना बसलेला आहे कर्जमाफीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.गेले तीन दिवस ते नागपुरात आहेत.लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे. या अंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. तसेच माहामार्ग रोखल्याने वाहन चालकांना मोठा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT