Sambhaji Raje SaamTv
Video

Sambhajiraje's statement: धनंजय मुंडेंचं 'यांच्याशिवाय' पान हलत नाही, संभाजीराजे स्पष्टच बोलले

Santosh Deshmukh Death Case : बीडच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज आयोजित सर्व पक्षीय मोर्चात संभाजी राजेंनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

Saam Tv

बीडमध्ये आज मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देखमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा निघाला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून् फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी सर्वपक्षीय नेत्यानी यावेळी एक सूरात केलेली दिसली. या सर्वपक्षीय मोर्चामध्ये माजी खासदार संभाजीराजे सहभागी झाले होते. आपल्या भाषणातून संभाजी राजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, पंकजा मुंडे सभेत म्हणतात, वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही. धनंजय मुंडे यांनीही वाल्मिक कराड सोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. घरचे संबंध आहेत. व्यवहारिक संबंध आहे, असं म्हटलं आहे. वटमुख्त्यार पत्रही त्यांना व्यवहार करण्यासाठी दिले आहे. जो विश्वासू असतो त्यालाच वटमुख्त्यार पत्र दिलं जातं, असं म्हणत आम्ही हा दहशत खपवून घेणार नाही, असा इशारा संभाजी राजेंनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, या महोरक्याचा नेता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन हे सांगतो आहे. ज्यावेळी मी त्यांच्या घरच्या लोकांना भेटलो. चर्चा केली. तेव्हा एकच निर्णय घेतला. जर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर मी पालकत्व घेणार. कुणी दहशत करत असेल तर मी या ठिकाणी येणार. हा महाराष्ट्र आपला आहे. बीडचा बिहार करायचा का? त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

SCROLL FOR NEXT