Rohit Pawar SaamTv
Video

Rohit Pawar : राजीनामा द्यायची नैतिकता दाखवायचं धाडस त्यांच्यात नाही, रोहित पवारांची धनंजय मुंडेंवर टीका | Video

Rohit Pawar On Dhananjay Munde : थोडं धाडस दाखवुन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज केली.

Saam Tv

थोडं धाडस दाखवुन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या प्रकरणात नैतिकता दाखवण्याची गरज आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. तसंच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोवर मुंडे यांनी राजीनामा द्यावा होत असतानाच आता रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. लोणंद येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, हिंदी बोलताना शब्द चुकला होता, तेव्हा आर. आर. पाटील यांनी राजिनामा दिला होता. तसंच अजित पवार माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही राजीनामा दिला होता. यामुळं त्यांचा जो पक्ष आहे त्याचे नेते दादा आहेत. त्यावेळी दादांनी ही अशी नैतिकता दाखवली होती त्यांच्या पक्षातील नेत्याच्या कार्यकरत्यावर आरोप होत आहेत. यामुळं त्यांनी नैतिकता दाखवुन दाखवुन राजीनामा द्यावा नैतिकता दाखवायला धाडस लागतं ते त्यांच्या नेत्यांमध्ये नाहीये, असं वक्तव्य आमदार रोहीत पवार यांनी साताऱ्यातील लोणंद येथे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT