praful patel sunil tatkare News Update  Saam
Video

NCP controversy : पटेल-तटकरेंना राष्ट्रवादीवर ताबा घ्यायचा होता, घटनेत बदल केला; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar on Tatkare Patel praful patel NCP controversy : रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडवली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या घटनेत गुपचूप बदल केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

praful patel sunil tatkare News Update : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या १८ दिवसांत पक्षाच्या घटनेत बदल करण्यासाठी पत्र पाठवल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

१६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून तटकरे-पटेल यांनी पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली. या पत्रावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्या आहेत. पक्षाचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे सोपवण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या घटनेत बदल करून राष्ट्रीय अध्यक्षांएवढेच अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षाला देण्यात आल्याची चर्चा आहे.

सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा पक्षाच्या इतर आमदारांना विश्वासात न घेता तटकरे-पटेल यांनी बदल केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ते पत्रही दाखवले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्ष पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यायचा असून, पक्षाची सर्व शक्ती स्वतःकडे ओढून घेण्याचा हा मोठा डाव असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, शेतकरी हैराण

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT