Attari Wagah Border Beating the Retreat ANI
Video

Republic Day 2025 : अटारी-वाघा बॉर्डरवर 'बिटिंग द रिट्रीट', भारतीय जवानांनी दिल्या गगनभेदी गर्जना, पाहा VIDEO

Attari - Wagah Border Beating the retreat : ७६ व्या प्रजासत्ताक दिनी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने अटारी-वाघा बॉर्डरवर होणारा 'बिटिंग द रिट्रीट' हा सोहळा पाहण्यासाठी असंख्य नागरिक जमले होते.

Yash Shirke

Beating the retreat from the Attari - Wagah Border : आज देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अटारी-वाघा बॉर्डरवरही प्रजासत्ताक दिनी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदाही मोठ्या प्रमाणात अनेक राज्यांमधील नागरिक 'बिटिंग द रिट्रीट' पाहण्यासाठी अटारी-वाघा बॉर्डरवर जमले होते. बिटिंग द रिट्रीट सोहळ्यात भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवले. जमलेल्या सर्वांनी 'भारत माता की जय', 'जय हिंद' अशा घोषणा देत जवानांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमात भारताकडून बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानकडून पाकिस्तानी रेंजर्स आमनेसामने असतात. या सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT