Ratan Tata Funeral Update SaamTv
Video

VIDEO : 'रत्न' हरपला; रतन टाटा यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Ratan Tata Funeral : रतन टाटा यांना गरुवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Saam Tv

उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी येथील स्मशानभूमीत आणण्यात आल्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी 5.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी दिवसभर एनसीपीएमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी अनेक दिग्गज नेते, कलाकार, उद्योजकांनी याठिकाणी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एका दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. टाटा हे पारशी असल्याने त्यांच्यावर पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रतन टाटा यांना प्रकृती खालवल्याने बुधवारी दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT