Strawberry Moon Google
Video

Strawberry Moon 2025 : आकाशात दिसणार रहस्यमयी ‘स्ट्रॉबेरी मून’| VIDEO

Strawberry Moon 2025 : आज आकाशात वर्षातील सर्वात सुंदर खगोलीय घटना दिसणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री ७ नंतर आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’ म्हणजेच गुलाबी छटेचा पूर्ण चंद्र दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजची रात्र खगोल निरीक्षकांसाठी आणि आकाशप्रेमींसाठी खूप खास असणार आहे.आज वर्षातील सर्वात सुंदर खगोलीय घटना आकाशात दिसणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी आकाशात ‘स्ट्रॉबेरी मून’ म्हणजेच गुलाबी छटेचा पूर्ण चंद्र दिसणार आहे. ही परिस्थिती दर १८.६ वर्षांनी एकदाच येते. त्यामुळे आजचा चंद्रप्रकाश दुर्मिळ ठरणार आहे. या आधी असा चंद्र 2005 मध्ये दिसला होता आणि पुढील संधी 2043 मध्ये मिळेल.

यावर्षी चंद्र पृथ्वीपासून सर्वात दूर अंतरावर असेल, त्यामुळे तो नेहमीपेक्षा थोडा लहान आणि कमी दिसणार आहे . ‘स्ट्रॉबेरी मून’ हे नाव जुन्या अमेरिकन स्थानिक जमातींकडून आले असून, या काळात स्ट्रॉबेरी फळांची कापणी होत असल्यामुळे या चंद्राला हे नाव देण्यात आले आहे .

ही खगोलीय घटना आज रात्री ७ नंतर आकाशात स्पष्टपणे पाहता येणार आहे. विशेष साधनेशिवायही उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून याचा अनुभव येणार आहे.रात्री आकाश निरभ्र असल्यास 'स्ट्रॉबेरी मून' चे सौंदर्य अधिकच खुलून दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT