Rajan Patil folding hands while apologising to Ajit Pawar over his son Balraje’s controversial remarks during the Angar election issue. Saam Tv
Video

अजितदादा माफ करा, पदरात घ्या..., बाळराजेंच्या चॅलेंजवर अनगरच्या राजन पाटलांचा माफीनामा|VIDEO

Rajan Patil Apologises To Ajit Pawar: अनगर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना दिलेल्या आव्हानानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी अजित पवार यांची माफी मागितली.

Omkar Sonawane

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर बाळराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले होते. यावर बोलताना राजन पाटील यांनी आपण मुलाच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. पाटील म्हणाले, त्याचे मी समर्थन करत नाही. मी अजितदादांचे, मोठ्या साहेबांचं, पवार परिवारांचं त्या ठिकाणी दिलगीरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणी मी लीन होतो. त्यांनी म्हटले की, अनगरमध्ये निवडणुका सहसा बिनविरोध होतात. मात्र यावेळी निवडणूक लागल्याने मुले उत्साहाच्या भरात बोलली असतील. हा विषय इथेच संपवावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

माझ्या मुलाच्या तोंडून न कळत, भावनेत, उत्साहात जे अपशब्द गेलेत ते जायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादा आणि पवार परिवाराचं अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो, मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझी विनंती हा विषय आता थांबवावा. अजितदादांनी पार्थ किंवा जयसारखं समजून बाळराजे पाटलांना पदरात घ्यावं, अशी विनंती त्यांनी अजित पवारांना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT