Raj Thackeray Saam Tv
Video

Raj Thackeray: 'कोण कुठे चाललंय? कोणाच्या सोंगट्या कोणाच्या...'; नेत्यांच्या पळवापळवीवरून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आज नाशिकमध्ये सुरु आहे. यासाठी राज ठाकरे हे नाशिकच्या गेटवे हॉटेलमध्ये स्वतः कार चालवत पोहोचले आहेत.

Shruti Vilas Kadam

Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आज नाशिकमध्ये सुरु आहे. यासाठी राज ठाकरे हे नाशिकच्या गेटवे हॉटेलमध्ये स्वतः कार चालवत पोहोचले. तर, राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे सुद्धा हॉटेल गेटवे मध्ये दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. दोन्ही बंधूंच्या संयुक्त सभेला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी भाजपवर तुफान फटकेबाजी केली. नेत्यांच्या पळवापळवीवरून त्यांनी मिश्किल भाषेतील टीका केली.

चार वर्षांपूर्वी मुदत संपूनही महानगरपालिकेच्या निवडणुका का झाल्या नाहीत, याचे उत्तर आताच्या सरकारने दिले पाहिजे, त्यानंतर राज्यात ज्या प्रकारचा राजकीय गोंधळ सुरू आहे.त्याचेही उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पक्ष बदलांवरून राज ठाकरेंनी यावेळी टीका केली. नेत्यांची पळवापळवी आणि नेत्यांची पक्ष बदलण्याचे प्रमाण इतकं झालं की त्यातून कोणता नेता कोणत्या पक्षात हे समजत नाहीये. “कोण कुठे चाललंय, हेच कळत नाही. चुकीच्या पद्धतीने कॅरम फुटल्यानं सर्व गोंधळ उडालाय. त्यामुळे कोणाच्या सोंगट्या कोणत्या होलमध्ये गेल्या आहेत, ना तेच कळत नाही, ” अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली. राज्यात ६० ते ७० जागा बिनविरोध निवडून येतात कशी असा सवाल करत त्यांनी लोकशाहीसाठी धोकादायक आल्याचं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT