Raj Thackeray latest speech today Saam TV Marathi News
Video

Raj Thackeray : शाळा-कॉलेजात ड्रग्ज पोहोचलं, लहान मुलं पळवली जात आहेत; गृहमंत्री काय करतायत? राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

Raj Thackeray latest speech today : महाराष्ट्रात शाळा-कॉलेजमध्ये ड्रग्ज पोहोचल्याचा आणि हजारो मुले बेपत्ता होत असल्याचा गंभीर आरोप करत राज ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा मुद्दा सविस्तर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray speech on drugs in schools Maharashtra : संपूर्ण महाराष्ट्रभर आज ड्रग्जचा विळखा पसरला आहे. शाळा-कॉलेजमध्ये ड्रग्ज पोहोचले आहे. आपली तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकली आहे. तरूण-तरूणी ड्रग्जच्या विळख्यात अडकला आहे. तर लहान मुलं बेपत्ता होत आहेत, याची आकडेवारीच राज ठाकरेंनी मांडली. राज ठाकरेंनी शिवतीर्थावरून सरकारवर तोफ डागली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेली आकडेवारीच महाराष्ट्राची ही भयानक स्थिती असल्याचे ते म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीचा दाखला राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला. महाराष्ट्रात शाळा आणि कॉलेजमध्ये उघडपणे ड्रग्ज विकले जात आहेत. तरुण मुले-मुली या व्यसनाच्या आहारी जात आहेत. सरकार नक्की काय करत आहे? गृहमंत्र्यांनी स्वतः कबूल केले आहे की राज्यातील ड्रग्जची परिस्थिती गंभीर आहे. पण केवळ आकडेवारी देऊन प्रश्न सुटणार नाही, असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला.

केवळ ड्रग्जच नव्हे, तर राज्यातील मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवरही राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली. एनसीआरबीच्या (NCRB) आकडेवारीचा राज ठाकरेंनी दाखला दिला. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे साडेचार ते साडेपाच हजार मुले बेपत्ता होतात. मुंबईसारख्या शहरात दरवर्षी २ हजारांहून अधिक मुले बेपत्ता होतात. नवी मुंबईत जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या काळात ४९९ मुलांच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा

Raj Thackeray Live : इन्स्टाग्रामच्या नादातून बाहेर पडा, राज ठाकरेंनी सांगितला सरकारचा प्लान

आता ATM मधून मिळणार गॅस, रिकामं सिलेंडर आणा आणि भरून घ्या, वाचा नेमकं सत्य

Maharashtra Live News Update: शिवतीर्थावरून राज ठाकरे लाइव्ह, बघा

Raj Thackeray : राजगर्जना...मोदींवर ठाकरे शैलीत वार, म्हणाले याची किंमत मोजावीच लागेल

SCROLL FOR NEXT