Raj Thackeray sharing a heartfelt political memory involving Balasaheb Thackeray during his recent speech in Mumbai. saam tv
Video

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Raj Thackeray Recalls Balasaheb Thackeray: राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात १९९९ सालचा एक किस्सा सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपचा सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव धुडकावला होता. "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त मराठीच होईल," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.

Omkar Sonawane

मुंबई: राज ठाकरेंनी आपल्या भाषणादारम्यान एक बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एका किस्सा सांगितला. 1999 साली शिवसेना भाजप सरकार येणार नाही अशी परिस्थिति होती. शरद पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे निवडणूक लढले होते. शिवसेना आणि भाजपच्या वादामध्ये काही तोडगा निघत नव्हता. एक दिवशी मी मातोश्रीच्या खाली बसलो होतो, अचानक दोन गाड्या आल्या. प्रकाश जावडेकर आणि काही लोक आली. मला म्हणाले, आताच बाळासाहेबांना भेटायचे आहे. मात्र, त्यावेळी बाळासाहेब झोपले होते. मी त्यांना बोललो की ते झोपले आहे.

आता नाही भेटणार तुमचा काय निरोप असेल तर मी सांगतो. तर ते म्हणाले, सुरेश जैन यांना मुख्यमंत्री बनवायचे आमचे ठरलं आहे. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचे आहे, तर मी वरती गेलो ते गाढ झोपले होते. मी त्यांना उठवले ए काका उठ.. ते म्हणाले काय रे तर मी त्यांना संगीतले की काका खाली जावडेकर आणि भाजपची मंडळी आली आहे. ते म्हणताय की सुरेश जैन यांना मुख्यमंत्रीपदासाठी नावाला आम्ही पाठिंबा दिला आहे.

त्यावेळी बाळासाहेबांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त मराठी माणूस होईल दुसरे कोण होणार नाही. मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली आणि तेच संस्कार आमच्यावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT