MNS activists vandalizing the unauthorized washing center of Sujit Dube in Andheri East. Saam Tv
Video

राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबेच्या दुकानाची मनसैनिकांकडून तोडफोड|VIDEO

Raj Thackeray Insult Sparks: मुंबईत अंधेरी पूर्वेकडील सुजित दुबे यांच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरवर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. दारूच्या नशेत राज ठाकरे यांना शिवीगाळ केल्याने मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

Omkar Sonawane

दारूच्या नशेत एका परप्रांतीय तरुणाने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेच्या माथाडी कामगार सेनेकडून मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील महाकाली रोडवरील सुंदरनगर परिसरात आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय नागरिक सुजित दुबे यांच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरवर तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले की, तो मराठ्याला चॅलेंज करतोय. मराठी माणसाला आव्हान देतोय. तसेच, त्यांनी आरोप केला की वॉशिंग सेंटर अनधिकृत असून तिथे ड्रग्स सप्लायसारख्या इतर अनेक गैरकायदेशीर धंदे चालत आहेत.

मनसैनिकांनी नमूद केले की, सुजित दुबे आणि शिवम बाल यांनी राज ठाकरे यांना शिवीगाळ केली होती. पोलिसांनी सुजित दुबेच्या वडिलांना अटक केली असून, सुजित दुबे रात्रीपासून फरार आहे. मनसैनिकांनी इशारा दिला आहे की, जोपर्यंत सुजित दुबे सापडत नाही, तोपर्यंत असे प्रकार सुरू राहतील आणि मराठी माणसाला आव्हान देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Price Hike: मुंबई-पुण्यात घराचं स्वप्न महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, घराची किंमत का वाढतेय?

Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जोरदार धक्का

Maharashtra Live News Update: जमीन घोटाळ्यात शिरसाट यांचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Samsung Galaxy S25 FE स्पेसिफिकेशन्स आणि रंग पर्याय लीक, 'या' दिवशी होऊ शकतो लाँच

SCROLL FOR NEXT