Raigad Guardian Minister Saam Tv
Video

Raigad Guardian Minister: रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, अजित पवारांच्या बैठकीला शिंदेसेनेचे नेते गैरहजर

Ajit Pawar Meeting: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे गटाचे नेते आणि आमदार उपस्थित नव्हते.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्ह्याची बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्यामुळे अजित पवार यांनी बैठक घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी हे तिन्ही नेते उपस्थित राहिले नाहीत. या तिन्ही नेत्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. मंत्रालयात असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नव्हते त्यामुळे ऑनलाईन बैठकीला हजर राहण्याची सुविधा देण्यात आली होती. पण ऑनलाइन देखील हे तिन्ही नेते उपस्थित राहिले नव्हते.

रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे, बाकीचे नेते आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत पार पडली. पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले आग्रही होते. पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते आणि त्यांनी थेट नाराजी देखील व्यक्त केली होती. त्याचसोबत शिवसेनेला पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे रायगडमध्ये राजीनामा सत्र देखील सुरूच होते. पालकमंत्रिपदावरून शिंदे गटात नाराजी कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT