Pune News  Saam Tv
Video

Pune: जमिनीसाठी एकमेकांच्या जिवावर उठले, पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

Pune land dispute video: पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. महिला आणि तरुणांच्या गटांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

पुणे जिल्ह्यातील खेड तालुका पुन्हा एकदा जमिनीच्या वादामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाला. जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महिलांचा गट आणि स्थानिक तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली. खेड तालुक्यातील वाफगाव येथे ही घटना घडली. जमिनीचा ताबा घेण्यासाठी बाहेरून काही महिला आल्या होत्या. मात्र स्थानिकांनी त्यांना विरोध करताच वाद चिघळला आणि काही क्षणातच हा वाद थेट हाणामारीत परिवर्तित झाला. महिलांसह तरुणांमध्ये जोरदार ढकलाढकली, मारामारी आणि गोंधळ उडाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ समोर आले असून त्यात उघडपणे सुरू असलेली हाणामारी स्पष्ट दिसत आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे पोलिस घटनास्थळी पोहोचूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. जमिनीच्या ताब्यासाठी अशाप्रकारे महिलांचा वापर करून उघडपणे राडे घडवले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT