Pune Police parade arrested youths involved in a machete attack in Aundh, showcasing seized weapons including a country-made pistol and iron machetes. Saam Tv
Video

जिथे उगारले कोयते, तिथेच पोलिसांनी आरोपींची काढली धिंड! पुण्यात औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात जणांना अटक|VIDEO

Pune Machete Attack: पुण्यातील औंध परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत माजवणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना सार्वजनिकपणे फिरवून पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

पुणे: औंध भागात कोयत्याने हल्ला करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सात जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींची धिंड काढत पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. २८ जून रोजी रात्री १२.१५ वाजता औंध परिसरात काही तरुणांवर कोयते आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

प्रतीक सुनील कदम (वय २६),

अमीर अल्लाउद्दीन शेख (वय २८),

अतुल श्याम चव्हाण (वय २७),

रॉबिन दिनेश साळवे (वय २६),

समीर अल्लाउद्दीन शेख (वय २६),

जय सुनील गेंगाट (वय २१),

आणि अभिषेक अरुण आवळे (वय २४).

पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त केले आहेत. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करत परिसरात कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

Samantha Ruth Prabhu : ३९व्या वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार? 'त्या' व्हायरल VIDEO ने सुरू झाली चर्चा

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

SCROLL FOR NEXT