ujjwal nikam, Pravin Darekar SAAM TV
Video

Pravin Darekar On Ujjwal Nikam | भाजपकडून निकम यांना उमेदवारी, दरेकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवलं आहे. आता निकम विरुद्ध गायकवाड असा थेट सामना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात होणार आहे. निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे.

मी उमेदवारीचं स्वागत करतो. भाजपचं मनापासून अभिनंदन करतो. निकम यांनी २६-११ हल्ल्याच्या खटल्यात काय भूमिका निभावली आहे हे अवघ्या देशानं पाहिलंय. अशा प्रकारचं एक निष्णात वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलीय. त्यांचं स्वागत आहे. एक चांगला संदेश यातून सर्वसामान्यांमध्ये आणि समाजमनात जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान असेल का याबाबत विचारलं असता, अजिबात आव्हान नसेल, असंही दरेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhan Rajyog 2026: 30 वर्षांनंतर शनी देव बनवणार धन राजयोग; या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी

Shadashtak Yog: 12 महिन्यांनी तयार होणार खास राजयोग; गुरु-शुक्राच्या कृपेने या राशींचं नशीबाचं ताळ उघडणार

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

SCROLL FOR NEXT