Prakash Ambedkar  Saam tv
Video

Prakash Ambedkar : भारत-पाक युद्धात विजयाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar Latest news : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावर भाष्य केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली ? याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय राजकारणात नेतृत्व हे महत्त्वाचं आहे. गल्लीतील भांडणात जो आक्रमक असतो, तो जिंकतो. गल्लीतील लढाईत जे होते, ते मोठ्या लढाईत सुद्धा तेच होते. तुम्ही पाकिस्तान विरोधात जिंकत असताना माघार का घेतली ? असा सवाल त्यांनी केला.

'राजकीय पक्षांनी भारत पाकिस्तान संघर्षावर उघडपणे बोललं पाहिजे. सरकारच्या कुचकामी भूमिकेला प्रश्न केला पाहिजे. देशाची सुरक्षा फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर जनतेची आहे. जनतेने यात सहभाग घ्यावा आणि यावर सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मराठा बांधवांना 'सरसकट कुणबी' संबोधण्यास नकार

Manoj Jarange Patil Protest Live Updates : नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना घेराव

Munawar Faruqui: आईच्या आठवणीनं भावुक झाला कॉमेडियन, बालपणीच्या कटू आठवणी सांगितल्या; म्हणाला, वडील खलनायक...

Kaas Pathar : फुलांचे स्वर्ग खुले! कास पठाराचा हंगाम ४ सप्टेंबरपासून सुरु

SCROLL FOR NEXT