Sahar Shaikh Mumbra saam tv
Video

Sahar Shaikh : मुंब्रा हिरवं करू म्हणणाऱ्या सहर शेखला पोलिसांची नोटीस

sahar shaikh police notice mumbra : मुंब्रा हिरवं करू, असं जाहीर भाषणात म्हणणारी तरुण नगरसेविका सहर शेखला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यामुळं स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

Nandkumar Joshi

ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरात एमआयएमनं मोठा विजय मिळवला. पक्षाची सर्वात तरूण नगरसेविका सहर शेख हिनं विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिलं होतं. आमचं राजकारण पक्षाच्या विचारधारेशी जोडलेलं आहे. पाच वर्षांनंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवायचा आहे. या लोकांना येथून हद्दपार करायचं आहे, असं सहर शेख म्हणाली होती. सहर शेखच्या या विधानावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता. त्यावर तिनं स्पष्टीकरणही दिलं होतं. पक्ष ही आमची ओळख आहे आणि पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, असं ती म्हणाली होती.

कैसे हराया...असं म्हणून विरोधकांना डिवचणाऱ्या सहर शेखचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवाय मुंब्रा हिरवं करू, असं विधान करून नवा वाद निर्माण झाला होता. यावरून आता मुंब्रा पोलिसांनी सहर शेखला नोटीस बजावली आहे. कोणाच्याही भावना दुखावतील असं भाषण करू नये, अशी समज तिला देण्यात आली आहे. सहर शेखच्या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. तसेच मुंब्रा पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले होते. त्यावर पोलिसांनी तिला नोटीस बजावून समज दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT