महायुती सरकार राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळे पाऊलं उचलत आहे. महिलांसाठी आम्ही वेगवेगळ्या योजना आणत आहे. मात्र काँग्रेस या योजना बंद करण्यासाठी विविध कटकारस्थान रचत आहे. त्याचसाठी ते माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना ही सत्ता मिळाली तर सर्वप्रथम ते ही योजना बंद करतील. त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांच्यापासून सावध रहावं. हे लोक कधीही नारीशक्तीला सशक्त होताना पाहू शकत नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. आजपासून दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी धुळ्यातील आपल्या पहिल्या प्रचारसभेत त्यांनी राज्यातील जनतेला महायुतीच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबू देणार नाही. पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार. महाराष्ट्राला हवे असणारे सुशासन केवळ महायुतीचंच सरकार देऊ शकतं. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाकं आहेत, ना ब्रेक आहे आणि ड्रायव्हरच्या सिटवर बसण्यासाठीही त्यांच्यात वाद सुरू आहे, अशी टीका देखील त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.