एससी, एसटी, ओबीसी समाजातील मंडळींकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसने या घटकांना जाणूनबुजून मागे ठेवलं. मागासवर्गीय विरोधी मानसिकतेला आम्ही मागे टाकले. विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक फायदा एससी एसटी ओबीसीला मिळाला आहे. महाविकास आघाडीने कापसाला शेतकऱ्यांची ताकद बनवण्यापेक्षा त्यांची उपेक्षा केली. मविआने केवळ भ्रष्टाचार केला, असे गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्ध्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. तसेच पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिल्याचे विकसित भारतासाठी विश्वकर्मा योजना रोडमॅप असल्याचे म्हंटल. ''आमच्या सरकारने या परंपरागत कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजना आणली. सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट आहे. देशातील 700 हुन अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती अभियानाला गती देत आहेत. केवळ महाराष्ट्रात 7 हजार कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले. वर्षभरात साडेसहा लाखांहून अधिक बांधवांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत, त्यातून उत्पादकता वाढली असून त्यांना 15 हजारांचं ई व्हाऊचर देखील देण्यात आलं आहे, असंही मोदी यांनी म्हंटल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.