Devendra Fadanvis News SaamTv
Video

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वर्ध्यात 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Saam Tv

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरचा कर वाढवा म्हणजे सोयबीनचा भाव वाढेल, अशी आम्ही मागणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच याबद्दल निर्णय घेतला. त्यामुळे आज सोयाबीन पिकाला भाव मिळायला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे निर्माते असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वर्ध्यात 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी झाले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजना देखील लाँच केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 'सुतार, लोहार, चांभार अशा सर्व समाज घटकाचा विचार आतापर्यंत करण्यात आला नव्हता. त्यांचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचंही फडणवीस यांनी म्हंटल आहे. अमरावतीमधील पार्क टेक्सटाईल पार्कमुळे 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा देखील त्यांनी या वेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

Woman Saree Look: साडी नेसलेल्या मुली मुलांना का आवडतात?

Maharashtra Live News Update: आबा बागुल यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT