Pawar Family Saam Tv
Video

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. बुधवारी विमान अपघातामध्ये त्यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्ष एकत्रित करण्याबाबतचा लवकरच अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्ष एक करण्याबाबत लवकरच पवार कुटुंबिय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, स्वत: शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते. अजित पवार नसल्यामुळे आता पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत.

अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. २८ जानेवारीला सकाळी पावणे नऊ वाजता ही घटना घडली. अजित पवार हे बारामतीला सभांसाठी येत होते. पण बारामतीमध्ये पोहचण्यापूर्वीच त्यांचे विमान कोसळले. विमान कोसळ्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाचे अनेक तुकडे झाले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फक्त पवार कुटुंबीय नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

Sanjay Dutt : सोनं, लाखोंचं घड्याळ अन् बरंच काही; संजय दत्तला पाकिस्तानी चाहत्याकडून महागड्या भेटवस्तू

SCROLL FOR NEXT