Shahaji Patil seen flashing a pistol while threatening farmers demanding road access in Tadawale, Madha. saamtv
Video

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

Pandharpur Crime: माढा जिल्ह्यातील तडवळे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवरस्त्याची मागणाऱ्या शेतकऱ्यांना शहाजी पाटील यांनी पिस्तूलचा धाक दाखवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावण्याची घटना घडली.

  • महसूल अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान धमकावण्यात आलंय.

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

माढा तालुक्यातील तडवळे येथील रस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याची घटना घडलीय. शहाजी पाटील असं धमकावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शहाजी पाटील यांनी गावातील काही शेतकऱ्यांचा शिवरस्ता अडवला होता. रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी काही शेतकरी माढा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान आज महसूल अधिकारी आणि शेतकरी रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शहाजी पाटील याने कमरेला लावलेले मिस्टल काढून धमकावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान जोपर्यत रस्ता खुला करुन दिला जात नाही, तोपर्यत उपोषणावरुन उठणार नसल्याचा ठाम पवित्रा आंदोलक गावकऱ्यांनी घेतला आहे. शिवरस्ता अडवलेल्या शहाजी पाटील यांनी मोजणीच्या वेळेस तहसीलदार-पोलिस प्रशासनासमोरच पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न झालं अन् सासरी निघाली, वाटेतच नवरी गायब; नवरा डोक्याला हात लावून बसला, नेमकं काय घडलं?

Pune: फोडलेला नारळ, लिंबू, हदळ-कुंकू अन्...; घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; घटनेचा सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन सुरू

राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; भाजप मंत्र्याचा रोख कुणाकडे? VIDEO

BJP Vs Shiv sena: बोर्ड फाडले, एकमेकांना घातल्या लाथा; वरळीत भाजप-ठाकरे सेनेत का झाला राडा?

SCROLL FOR NEXT