Dhanasar MIDC Fire News Saam TV
Video

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Dhanasar MIDC Fire News: पालघर जिल्ह्यातील धनसार एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर जिल्ह्यातील धनसार एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्लॅटिनम पॉलिमर्स या कंपनीला रात्री अंदाजे तीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिक तपास आणि पंचनामा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT