Firing on LoC for Eighth Consecutive Day 
Video

Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकची मुजोरी सुरुच, सलग आठव्या दिवशी गोळीबार, भारताकडून प्रत्युत्तर | VIDEO

Firing on LoC for Eighth Consecutive Day : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने सलग आठ दिवस नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे. भारतीय लष्कराकडून ठोस प्रत्युत्तर देण्यात आले असून, सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Namdeo Kumbhar

India Pakistan LOC firing : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेलेत. दोन्ही देशाच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार गोळीबार केला जातोय. मागील आठ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेखेवर गोळीबार केलाय. भारतीय सैन्याकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जातेय.

३० एप्रिल ते १ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानी सेनेच्या चौक्यांनी जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरसमोरील नियंत्रण रेषेवर (LoC) कोणत्याही गोळीबार केला. भारतीय सेनेने याला तात्काळ आणि योग्य प्रत्युत्तर दिले, असे भारतीय सेनेच्या निवेदनात म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना ही घटना घडली. यापूर्वीही पाकिस्तानने सलग सात दिवस सीजफायरचे उल्लंघन केले आहे. भारतीय सेनेने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून, कोणत्याही जिवितहानीची नोंद नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT