pakistani nationalist in Maharashtra saam tv
Video

Pakistani Nationalist : धक्कादायक! महाराष्ट्रातील ते १०७ पाकिस्तानी गेले कुठे? VIDEO

5023 Pakistani Citizens Found in Maharashtra : केंद्र सरकारच्या आदेशानंतर पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली जात आहे. महाराष्ट्रात पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यातील १०७ पाकिस्तान्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.

Nandkumar Joshi

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आपापल्या राज्यांतून पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारनंही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार, राज्यातल्या 48 शहरांत एकूण 5 हजार 23 पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून, ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT