NIA Chief Sadanand Date, the front-runner for the post of Maharashtra Director General of Police (DGP). Saam Tv
Video

कोण होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक? सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा|VIDEO

IPS officer Sadanand Date: महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांचे नाव आघाडीवर आहे. राज्य सरकारने केंद्राला दाते यांना कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवला असून रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर नवीन DGP निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) पदासाठी एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सदानंद दाते यांची पुढील DGP म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, दाते यांना एनआयए मधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे. सध्या कार्यरत DGP रश्मी शुक्ला या वर्षाअखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने नव्या DGP निवडीची प्रक्रिया सुरू आहे.

अलीकडेच राज्याच्या गृह विभागाने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवलेल्या सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यादीत सदानंद दाते यांचे नाव समाविष्ट असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीची शक्यता आणखी बळावली आहे.

1990 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 26/11 हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे आणि सध्या ते एनआयएचे प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

Hindu Wedding Ritual: लग्नामध्ये नवरी वराच्या डाव्या बाजूला का बसते? कारण काय?

शीतल तेजवानीच्या मुसक्या आवळल्या, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्या मास्टरमाईंडचे काळे कारनामे समोर

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT