17-year-old Sadhana Bhosale, a NEET aspirant from Sangli, died after being brutally assaulted by her father over poor exam performance saam tv
Video

Sangli News: NEET परीक्षेत कमी गुण पडले, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू|VIDEO

Father Turns Killer: नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याने मुख्याधापक पित्याने मुलीला बेदम मारहाण केली या मारहाणीत लेकीचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पुढच्या लेकीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे. साधना धोंडीराम भोसले वय 17 असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पती विरोधात पोलिसात फिर्याद देण्याचे वेळ आली.

धोंडीराम भोसले राहणार नेलकंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते.

पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुले आहेत. साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते. शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली. तिला दवाखान्यात नेले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात धक्कादायक प्रकार! 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीनच झाली गायब; आरोग्य विभागाचा गलथान कारभार?

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT