Sharad Pawar faction releases video showing alleged duplicate voter list entry of MLA Dnyaneshwar Katke’s wife in Shirur constituency. Saam Tv
Video

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Duplicate Voter ID Controversy: शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नीचं नाव मतदार यादीत दोनदा असल्याचा शरद पवार गटाने आरोप केला आहे.

Omkar Sonawane

शरद पवार गटाचा दावा – ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नीचं नाव मतदार यादीत दोनदा.

व्हिडिओद्वारे पुरावा दाखवून गंभीर आरोप निवडणूक आयोगावरही.

शिरुर हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा राजकीय गड असल्याने खळबळ.

देशभरात सुरू असलेल्या ‘व्होट चोरी’ वादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने उचलली धुळ.

शिरुर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शरद पवार गटाने त्यांच्यावर थेट आरोप करत कटके यांच्या पत्नीचं नाव मतदार यादीत दोनदा असल्याचा दावा केला आहे.

या संदर्भात शरद पवार गटाने एक व्हिडिओ जारी केला असून, त्यात स्पष्टपणे दोन वेगवेगळ्या यादीत त्याच व्यक्तीचं नाव असल्याचा पुरावा दाखवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिरुर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा राजकीय गड मानला जातो. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असा मुद्दा समोर आल्याने पवार गटाने कटके यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.

मागच्या काही दिवसांपासून व्होट चोरीचा मुद्दा हा देशभरात जोरदार गाजत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत पीपीटी बॉम्बच फोडला होता, यामध्ये त्यांनी मोठी यादी दाखवत कर्नाटक आणि देशातील काही भागामध्ये कशाप्रकारे व्होट चोरी झाले याचे पुरावे दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक व्हिडिओ ट्विट करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Mumbai Pune : मुंबई-पुणे महामार्गावर भयंकर अपघात, २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Sukanya Samruddhi Yojana: मुलींसाठी सरकारची खास योजना! महिन्याला २९१६ रुपये गुंतवा अन् १६.१६ लाख मिळवा

Tuesday Astro Remedies: दर मंगळवारी करा 'ही' 5 कामं; हनुमानाच्या कृपेने सर्व गोष्टी घडतील मनासारख्या

SCROLL FOR NEXT