Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar : अजित पवार घेणार बाबा आढाव यांची भेट | Marathi News

Baba Adhav Hunger Strike : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे ईव्हीएम विरोधात आत्मक्लेश उपोषण आंदोलन करत आहे. त्यांच्या या आंदोलनाला शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार हे देखील भेट देणार आहेत.

Saam Tv

अजित पवार देखील बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी अजित पवार आज पुण्यात दाखल होणार आहेत. आज सकाळी शरद पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील काही वेळात आढाव यांची भेट घेणार आहेत. तसंच अजित पवार हे सुद्धा पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी वयाच्या 95 व्या वर्षी ईव्हीएम विरोधात आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पुण्यातील फुले वाडा येथे हे उपोषण सुरू आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 3 दिवसांचं आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. यापूर्वी शरद पवार यांनी या ठिकाणी जाऊन आढाव यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे अजित पवार देखील आज पुण्यातील फुले वाडा येथे जाऊन बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याने त्यांच्यात काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बाबा आढाव यांच्या या आंदोलनावर अजित पवार काय भूमिका घेतील हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

SCROLL FOR NEXT