Navi Mumbai Rain Saam TV
Video

Navi Mumbai : नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! वाशी,बेलापूर,खारघरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात | VIDEO

Heavy Rains Lash Navi Mumbai : नवी मुंबई, बेलापूर, वाशी, खारघर, उरण या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईत अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून, वाशी, बेलापूर, खारघर आणि उरण परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, आणि आता जोरदार पावसाने शहरात एन्ट्री घेतली आहे.पावसाची तीव्रता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णतः सज्ज झाला आहे. जलमय होऊ शकणाऱ्या भागांमध्ये विशेष पथक तैनात करण्यात आलं असून, ड्रेनेज यंत्रणा, पाणी उपसणाऱ्या पंपांची चाचणी आणि नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे.

नागरिकांना सुरक्षित राहण्याचे, नाल्यांच्या आसपास न जाण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तास नवी मुंबईत अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Pujan 2025: ज्येष्ठ गौरी सणाचे महत्व काय?

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनामुळे भीषण वाहतूक कोंडी; चेंबूरमध्ये रस्त्यावर तब्बल ५ हजार वाहनं अडकली, VIDEO

Politics : अरविंद केजरीवालांना मोठा झटका, आपच्या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

Maharashtra Politics: सामान्य मुंबईकरांचा काय दोष? चंद्रकांत पाटील यांची मनोज जरांगेंना हात जोडून विनंती

SCROLL FOR NEXT