Lemon with kumkum and turmeric along with a paper found inside Belapur court premises Viral Video Screenshot Saam Tv
Video

नवी मुंबईतील कोर्टात अजब प्रकार; निर्णय वळवण्यासाठी लिंबू, हळद,कुंकूचा वापर|VIDEO

Superstition Practices Inside Indian Courts: नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात लिंबू, हळद, कुंकू आणि एक कागद वापरून अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कोर्ट प्रशासन याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबईतील बेलापूर येथील न्यायालयात एक विचित्र आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला आहे. कोर्टाच्या परिसरात एका लिंबाला हळद-कुंकू लावून त्यावर एक कागद रोवण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा प्रकार न्यायाच्या मंदिरात घडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संबंधित व्हिडीओमध्ये कोर्टाच्या आवारात लिंबू ठेवलेला असून त्यावर काहीतरी लिहिलेला कागद टोचलेला दिसतो. हळद-कुंकू लावल्यामुळे या घटनेला अंधश्रद्धेची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.

या घटनेनंतर आता कोर्ट प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का? याची माहिती घेणार का? आणि या प्रकरणाचा तपास करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या कृती न्यायव्यवस्थेच्या ठिकाणी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कायद्याच्या ठिकाणीच अशा गोष्टी घडणं दुर्दैवी असल्याचं नागरिकांकडून म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT