nashik news  saam tv
Video

Nashik Riots: नाशिक दंगल सुनियोजितच! जामिनासाठी आधीच केले होते बिझनेसमनचे अपहरण|VIDEO

Shakir Pathan Mastermind in Nashik Violence: नाशिक येथील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गेवरून 16 एप्रिल रोजी अचानक हजारो संख्येच्या जमावाने मध्यरात्री पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये सुमारे 21 पोलीस हे गंभीर जखमी झाले होते.

Omkar Sonawane

नाशिक येथील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गेवरून 16 एप्रिल रोजी अचानक हजारो संख्येच्या जमावाने मध्यरात्री पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये सुमारे 21 पोलीस हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी 1500 लोकांवर गुन्हा दाखल करत 39 आरोपींना अटक केली होती. या दंगलीचे महाविकासआघाडी कनेक्शन सामोर आले असून काही आरोपी अद्यापही फरार आहे. मात्र ही दंगल सुनियोजित असून याचा कट आधीच रचलेला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या दंगलीचा मास्टरमाइंड शाकीर पठाणने हा कट आधीच शिजवला होता, आणि त्यासाठी त्याने बारा दिवस आधीचं शहरातील कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्याणी यांचे अपहरण करून 15 लाखांची खंडणी वसूल केली होती.

ही रक्कम आपल्या जामीनासाठी हा दंगलखोर शाकीर पठाण वापरणार होता या सगळ्याचे नियोजन त्याने आधीचं करून ठेवले होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे या दंगलीखोरांवर अजून कडक कारवाई होणार असल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे. तर दंगलीतील महाविकास आघाडीचे संशयित आरोपी हनिफ बशीर, निलोफर शेख, अरीफ हाजी पटेल अद्यापही फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT