Nashik Police team leaving for Mumbai to execute the non-bailable arrest warrant against Minister Manikrao Kokate. Saam Tv
Video

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Nashik Police Team Leaves For Mumbai To Arrest Manikrao Kokate: नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नॉन-बेलेबल अटक वॉरंट जारी करण्यात आले असून ते बजावण्यासाठी नाशिक पोलिसांची विशेष टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.

Omkar Sonawane

नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांचा अटक वाँरंट देखील जारी करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या वकिलाच्या वतीने न्यायालयाला कोकाटे यांची प्रकृती बिघडलेली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र न्यायालयाने त्यांना फटकारत रुग्णालयात भरती झाल्याबाबतचे अधिकृत लेखी पुरावे सादर करावे असे सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात न्यायालयाने दिलेल्या नॉन-बेलेबल अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक पोलिसांची विशेष टीम थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोकाटे हे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती असून तेथे जाऊन अटक वॉरंट बजावण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करत नाशिक पोलिस लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावणार आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT