माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; आता क्रीडा खातं कोणाकडे? जाणून घ्या

Manikrao Kokate Resigns as Sports Minister : माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्राच्या क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता क्रीडा विभागाची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न कायम आहे.
Manikrao Kokate Resigns as Sports Minister :
Former Maharashtra Sports Minister Manikrao Kokate after submitting his resignation.
Published On
Summary
  • क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

  • नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणामुळे राजीनामा देण्यात आला.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंकडील क्रीडा खाते काढून घेतले.

नाशिकमधील सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवारांकडे आपला राजीनामा सोपवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केलेल्या मागणीवर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कारवाई केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्याकडे असलेले खाते काढून घेतले आहेत. कोकाटे हे राज्याचे क्रीडामंत्री होते. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रीडामंत्री कोण होणार याची चर्चा होती.

माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलीत. नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत त्यांना वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायलायाची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाय.

Manikrao Kokate Resigns as Sports Minister :
Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

दरम्यान कोकाटेंचा राजीमाना घेण्यासाठी अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांवर पडत असल्यानंतर मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून या प्रकरणावर चर्चा केली.

कोकाटे यांच्या अटकेनंतर राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेली खाते कोणाकडे द्यायचे याची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. त्यावेळी अजित पवार यांनी क्रीडामंत्री पदाबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला. काही वेळ विचार केल्यानंतर अजित पवार यांनी क्रीडा मंत्रीपद आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला.

Manikrao Kokate Resigns as Sports Minister :
Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

काय आहे प्रकरण

दिवंगत माजी मंत्री टी.एस. दिघोळे यांच्या तक्रारीवरून १९९५ मध्ये कोकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कोकाटे आणि त्यांच्या भावाला मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के विवेकाधीन कोट्याअंतर्गत येवलाकर माळा परिसरातील कॉलेज रोडवरील कमी उत्पन्न गटासाठी (एलआयजी) दोन फ्लॅट वाटप करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ अंतर्गत अपात्र ठरवले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com