Students walking to school on a chilly morning in Nashik as the Municipal Corporation revises school timings due to the intense cold wave. Saam Tv
Video

थंडीचा कडाका; शाळांच्या वेळेत मोठा बदल, पालिकेने काय निर्णय घेतला? VIDEO

Nashik Municipal Corporation Winter Guidelines: नाशिकमध्ये वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून महापालिकेने शाळांची सकाळची वेळ ७ वरून ८ वाजता केली आहे.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे नागरिकांसह लहान विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत नाशिक महापालिकेने शाळांच्या सकाळच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता पालिकेच्या सर्व शाळा सकाळी ७ ऐवजी ८ वाजता भरतील. थंडीचा पारा सातत्याने घसरत असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारच्या सत्राची वेळ मात्र पूर्ववतच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान खासगी शाळांसाठी हा निर्णय सक्तीचा नसून त्यांनी स्वतःच्या पातळीवर थंडीचा विचार करून वेळेत बदल करावा असे निर्देश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. याआधी पुण्यातही थंडीच्या वाढत्या परिणामामुळे शाळांच्या सकाळच्या वेळेत बदल करण्यात आला होता. आता नाशिक महापालिकेनेही तोच नियम लागू करत विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा स्फोट

Online Business Ideas: ५००० रुपयात सुरु करा ऑनलाइन बिझनेस; महिन्याला मिळतील लाखो रुपये

नागपूरमध्ये हलबा समाजाचं आंदोलन हिंसक, जात प्रमाणपत्रासाठी उपोषण, नेमके प्रकरण काय? VIDEO

Saturday Horoscope: मेषला आरोग्याच्या समस्या तर, या ५ राशींना मिळणार यश; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

SCROLL FOR NEXT