नाशिकचा महापौर कोण होणार, ४ महिला नेत्यांची नावं चर्चेत saam tv
Video

Nashik Mayor Race : अनुभवी विरुद्ध निष्ठावान; कोण होणार नाशिकचा महापौर? ४ महिलांची नावं चर्चेत

Nashik Mayor Election : नाशिक महापालिका निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. खुला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित झाले आहे. आता अनुभवी विरुद्ध निष्ठावान अशी लढत असणार आहे. नाशिकचा महापौर कोण होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनवणे, नाशिक | साम टीव्ही

नाशिक महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महापौरपदाचं आरक्षण खुला प्रवर्गासाठी राखीव झालं असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिकमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळं सत्ता ही भाजपची असणार आहे आणि महापौर देखील भाजपचा होणार आहे, हे निश्चित मानले जात आहे. भाजपमधून आता महापौरपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत अनेक नावं आघाडीवर आहेत. अनुभवी विरुद्ध निष्ठावान अशी ही अहमहमिका आहे.

माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. निष्ठावंतांमध्ये दीपाली कुलकर्णी आणि भाजपच्या आमदार सीमा हिरे समर्थक स्वाती भामरे यांची नावे देखील चर्चेत आहेत. या नारीशक्तीमधील स्पर्धेत कुणाची वर्णी लागणार याकडं नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT