हिरवाईनं नटलेला डोंगर, दोन्ही बाजूला गडद झाडी, त्यातून निघालेली चिंचोळी वाट आणि तीच वाट तुडवून पुढे दौडत वेगानं जाणारे फेसाळलेले पाणी असा निसर्गाचा चमत्कार एकाच ठिकाणी बघायला मिळतोय, तो म्हणजे इगतपुरीचा भावली धबधबा. हा अद्भूत नजारा डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं आता तिकडे वळू लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या, ओढे आणि धबधबे ओसंडून वाहताना दिसत आहेत. शेतकऱ्यांची चिंता तर मिटली आहेच, शिवाय पर्यटकांनाही मौजमजेची वाट सापडली आहे. जिल्ह्यातील निसर्गरम्य इगतपुरी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. भावलीचा धबधबाही वाहू लागल्यानं ते सध्या तालुक्याचं पर्यटनाचं ठिकाण झालं आहे.
शेकडो मीटर उंचीवरून पाणी कोसळत असल्याने हा भावली धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. धबधब्याचे मनमोहक सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. पर्यटकांची पावलं या ठिकाणी आपसुकच वळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.