OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Reservation Row: मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसींनी एल्गार पुकारलाय...मात्र ओबीसींनी नेमकी कशी रणनीती आखलीय? आणि भुजबळांनी सरकारलाच कसं खिंडीत गाठलंय?
Chhagan Bhujbal and OBC leaders intensify protests against Maratha reservation GR, hinting at a legal battle with the Maharashtra government.
Chhagan Bhujbal and OBC leaders intensify protests against Maratha reservation GR, hinting at a legal battle with the Maharashtra government.Saam Tv
Published On

मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी समाजाने वज्रमूठ आवळलीय..ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.. तर मुंबई ओबीसींच्या बैठकांसाठी हॉटस्पॉट ठरलीय... सलग 2 दिवस बैठकांचा सिलसिला सुरु झालाय. मुंबईच्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळलीय... तर भुजबळांनी सरकारला कोर्टात खेचण्याचा निर्धार केलाय...

एवढंच नाही तर विजय वडेट्टीवारांनीही सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा हल्लाबोल केलाय..

दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनीही हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या जीआर विरोधात राज्यभर संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केलीय...

मात्र एका बाजूला भुजबळ, वडेट्टीवारांसह राज्यभरातील नेत्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडें मात्र या बैठकीत हजर नव्हते.. तर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी बोलावलेल्या बैठकीला बबनराव तायवाडे हजर राहणार आहेत.. एवढंच नाही तर 10 सप्टेंबरला ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे... त्यामुळे मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे अस्वस्थ झालेल्या ओबीसींचा उद्रेक शांत कऱण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.. मात्र ओबीसी नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळत रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई लढण्याचं ठरवल्याने सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com