Maratha Reservation: आता मुंबईला जाणारा भाजीपाला आणि दूध पुरवठा बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation Row : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारने कारवाई करण्यास विलंब केल्यास मुंबईला होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखू असा इशारा मराठा नेते मनोज जरंगे यांनी दिलाय.
Maratha Reservation Row
Manoj Jarange calls for “Chalo Mumbai” protest; Beed meeting outlines roadmap for Maratha agitationSaam tv
Published On
Summary
  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले.

  • मुंबईला जाणारा भाजीपाला व दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला.

  • आझाद मैदानातील आंदोलनानंतरही संभ्रम कायम आहे.

आरक्षण मिळाल्यानंतर आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार. मुबंईत जाणारा भाजीपाला आणि दूध बंद करू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलन केलं होतं. सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या. ८ पैकी ६ मागण्या केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं. परंतु त्यानंतरही मराठा आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम आहे.

आता मुंबईचे खाणपाण बंद करू. मुंबईत जाणारा भाजीपाला आणि दुधावर बंदी आणू, असा इशार जरांगे पाटील यांनी दिलाय. मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिचार्ज झाल्यानंतर ते आज बीडच्या नारायण गडावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला इशारा दिलाय. सरकारने मराठा समाजाला १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,अशी मागणी केलीय. परंतु त्या सर्व प्रक्रियेला वेळ लागेल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

Maratha Reservation Row
Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करा; समता परिषदेचे जोरदार निदर्शने|VIDEO

यानंतर जरांगे आक्रमक झाले आहेत. जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू, अशी धमकीच त्यांनी आता दिलीय. जर भाजीपाला आणि दूध बंद केलं तर मुंबईकर काय वाळू खाणार का, असेही जरांगे म्हणालेत. जरांगे पाटील हे बीडच्या नारायण गडावर आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथे उपस्थित मराठा समाजाला जरांगे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपण दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केलं. आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार आहोत.

Maratha Reservation Row
Manoj Jarange: मराठ्यांनी 96 टक्के लढाई जिंकली; मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवालीत जल्लोष|VIDEO

सरकारने निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा देऊ असेही जरांगे म्हणालेत. नारायण गडावर आपल्या दसरा मेळाव्याच्या तयारीला लागा. जीआरचा फायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. जर काही चुकले तर सुधारित जीआर काढावा लागेल, हे आम्ही स्पष्ट करून घेतल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिलीय.

रॅप सॉन्गमधून गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सरकारकडून यश मिळाल्यानंतर हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अध्यादेश काढण्यात आला. मात्र, या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झालेत. दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. हैद्राबाद गॅझेटीयरनुसार कोणीही मागासवर्गीय ठरत नाही," असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. दरम्यान सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर एक रॅप सॉन्ग सादर करत त्यांच्यावर टीका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com