TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Ashwini Vaishnaw confirms TikTok ban in India remains : भारतात TikTok वरील बंदी अजूनही कायम आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. सध्या तरी टीकटॉकवरील बंदी हटवण्याबाबत किंवा हे अॅप पुन्हा लॉन्च करण्याची कोणतीच योजना सरकारकडे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.
TikTok Ban in India
TikTok Ban in Indiasaam tv
Published On
Summary
  • भारतात TikTok पुन्हा सुरू होणार का?

  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

  • TikTok वरील बंदी कायम

  • जून २०२० पासून TikTok आणि इतर चिनी अॅप्सवर बंदी

भारतात गेल्या महिन्यात अनेक मोबाइल आणि ब्रॉडबँड यूजर्सच्या नेटवर्कवर टीकटॉक वेबसाइटचा अॅक्सेस मिळाला होता. त्यावरून भारतात टीकटॉकवरील बंदी उठणार आणि भारतात पुन्हा सुरू होणार अशी अफवा पसरली होती. त्यावर स्वतः केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

भारतात टिकटॉक पुन्हा सुरू होणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. चिनी शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेली बंदी उठवण्यासंबंधी सरकारचा कोणताही प्लान नाही, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

एका मुलाखतीत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या मुद्द्यावर सरकारच्या पातळीवर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. कुणाकडूनही यासंबंधीचा प्रस्ताव आलेला नाही. टीकटॉकची पॅरेंट कंपनी ByteDance भारतात पुन्हा आणण्याची तयारी सुरू असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावर वैष्णव यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

...म्हणून परसली अफवा

गेल्या महिन्यात काही ब्रॉडबँड आणि मोबाइल नेटवर्क्सवर टीकटॉकची वेबसाइट काही वेळासाठी भारतात सुरू झाली होती. त्यानंतर भारतात पुन्हा टिकटॉक सुरू होणार अशी अफवा पसरली. तांत्रिक चुकांमुळं सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली होती. भारतात टिकटॉक अॅप पुन्हा सुरू होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मात्र, तसं काही होणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

TikTok वर बंदी कधीपासून

भारतात TikTok वर पहिल्यांदा जून २०२० मध्ये बंदी घातली होती. केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटा गोपनियतेच्या मुद्द्यावरून ५९ चिनी अॅप्स ब्लॉक केले होते. त्यानंतर अॅपल आणि गुगलनेही हे अॅप्स आपल्या स्टोरवरून हटवले होते. जानेवारी २०२१ मध्ये ही बंदी कायम करण्यात आली होती. भारतात जवळपास दोन कोटींहून अधिक यूजर्स या प्लॅटफॉर्मचा वापर करत होता.

TikTok Ban in India
Tik Tok Update: भारत-चीनची हातमिळवणी, टिकटॉक भारतात पुन्हा सुरु होणार?

त्याचप्रमाणे, ByteDance चे अन्य प्रोडक्ट्सनाही याच कारवाईला सामोरे जावे लागले होते. Helo आणि CapCut सारखे अॅप देखील TikTok सोबत ब्लॉक केले होते. त्यानंतर म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस Resso सुद्धा भारतात बंद करण्यात आली होती. गुगल प्ले आणि अॅपल अॅप स्टोरवरून दोन्हीही हटवण्यात आले होते.

TikTok Ban in India
Jio Recharge Offer: बल्ले-बल्ले! जिओ दररोज देणार फ्री २.५ GB डेटा अन् ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com