
३६५ दिवस चालणारे तीन उत्तम प्लॅन, दररोज मिळेल २.५ जीबी डेटा, ओटीटी देखील मोफत
रोज जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी जिओकडे तुमच्यासाठी खूप दमदार प्लॅन आहे. जिओच्या या प्लॅनबद्दल बोलत आहोत ज्यामध्ये तुम्हाला रोज २.५जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंत म्हणजेच वर्षभरासाठी व्हेलिडिटी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही(JIO TV) आणि जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) हे ओटीटी अगदी मोफत मिळणार आहे.
जिओ ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये जिओकडून २८ दिवसांची व्हेलिडिटी मिळणार आहे. आणखी या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी २.५जीबी डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनसाठी पात्र असणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड ५जी नेट सुद्धा मिळणार आहे.
अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी मोफत
या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसह जिओ हॉटस्टारचा मोफत अॅक्सेस देते. याशिवाय ग्राहकांना जिओ टीव्हीची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
जिओचा २०२५ रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लॅन २०० दिवसांसाठी वैध आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा आणि पात्र ग्राहकांना अमर्यादित ५जी डेटा मोफत दिला जातो.
मोफत कॉलिंग आणि ओटीटी
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. त्यासोबत जिओ हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा ५० जीबी मोफत अॅक्सेस दिला जातो.
जिओचा ३५९९ रुपयांचा प्लॅन
जिओचा हा वार्षिक प्लॅन ३६५ दिवसांसाठी वैध आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा आणि पात्र ग्राहकांना अमर्यादित ५जी डेटाची सुविधा दिली जाते.
जिओ टीव्ही, हॉटस्टार आणि कॉलिंग फ्री
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. त्यासोबत जिओ टीव्ही आणि जिओ हॉटस्टारचा मोफत अॅक्सेस देखील उपलब्ध करून दिला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.