CCTV footage shows Chaddi Gang members breaking into a house in Nashik’s Pawarwadi area at night. saam tv
Video

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Chaddi Gang robbery in Nashik: नाशिकरोड परिसरातील भारत भूषण सोसायटीमध्ये चड्डी गँगने बंद घरांमध्ये घरफोडी करून चार तोळे सोनं व रोकड लंपास केली. सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद झाला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Omkar Sonawane

नाशिक: नाशिकरोड परिसरातील पवारवाडी, भारत भूषण सोसायटी येथे चड्डी गँगने तीन ते चार ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. भारत भूषण सोसायटीमध्ये चार जणांच्या टोळीने अंधाराचा फायदा घेत बंद असलेल्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, घरात काही मिळाले नाही म्हणून त्यांनी जवळच असलेल्या दुसऱ्या घराचे कुलूप तोडले.

या घरातून त्यांनी 4 तोळा सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रहिवाशांनी नाशिक रोड पोलिसांकडे तत्काळ तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चड्डी गँगचा शोध सुरू केला आहे. चड्डी गॅंगला पकडण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Horoscope: आयुष्यात घडतील आश्चर्यकारक गोष्टी; व्यवसायात दुप्पट प्रगती, वाढेल आदर,जाणून घ्या राशीभविष्य

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT