CM Devendra Fadnavis, Eknath Shinde Shinde Saam Tv
Video

Kharat Case: सर्वात मोठा गौप्यस्फोट! मंत्रिमंडळातील ९ मंत्री खरातचे भक्त, भोंदू बाबाकडून घृणास्पद विधीचा आरोप

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट समोर आला असून, राज्यातील ९ मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संजय राऊतांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut allegations on Maharashtra ministers Kharat case : नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात आता शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील ९ मंत्री या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि ते अत्यंत घृणास्पद विधी करत होते, असा दावा राऊतांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, या भोंदू बाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे, ती जरी गोपनीय असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री त्याचे नियमित भक्त होते. हे मंत्री भोंदू बाबाकडे जाऊन 'अत्यंत घृणास्पद' प्रकारचे विधी करत होते. ही केवळ अंधश्रद्धा नसून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राऊतांनी लावून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT