Mumbai Boat Accident Update
Video

Mumbai Boat Accident Update : स्पीड बोटची धडक अन् कुटुंब उद्ध्वस्त, आई-वडिलासह चिमुकल्याचा अंत|VIDEO

Nashik : मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या आहेर दाम्पत्यासह चिमुकल्याचा मुत्यु झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Sea Boat Accident Update : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाताना बोट उलटल्याची दुर्घटना घटना बुधवारी घडली. उरणमधील जेएनपीटी रुग्णालयात एकूण 58 अपघातग्रस्त प्रवाशांना दाखल करण्यात आले होते. यामधील 57 प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेय. यामध्ये दोन जर्मन येथील परदेशी प्रवाशांचा देखील समावेश होता. तर यामध्ये एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. निधेश राकेश अहिरे असं या मयत मुलाचं नाव आहे. त्याच्या आई-वडिलांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झालाय. राकेश नानाजी अहिरे व हर्षदा राकेश अहिरे अशी आई-वडिलांची नावं आहेत. ते नाशिक जिल्ह्यातील बसवंत, पिंपळगाव येथील रहिवासी होते. तर मुंबई येथे अहिरे कुटुंबीय उपचारासाठी आले होते.

मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या आहेर दाम्पत्यासह चिमुकल्याचा मुत्यु झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावचे राकेश नाना आहेर हे दोन दिवसापूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबई येथे गेले होते. पण बोट दुर्घेटनेत आहेर कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र दुर्देवी अपघातात आहेर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

एलिफंटा ते गेटवे मध्ये काल झालेल्या बोट दुर्घटना नंतर आज सकाळ पासून अलिबाग मांडवा कडे बोटी निघाल्या आहेत मात्र या बोटीमध्ये जाण्याच्या आधी प्रवासी याना तिकीट काढताना सक्त ताकीद दिली जात आहे की सावकाश उतरा आणि सेफ्टी जॅकेट घालण्यात यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT