Civic officials and police personnel during the tense anti-encroachment drive in Naregaon, Sambhajinagar Saam Tv
Video

महापालिकेचा जेसीबी पाहताच संतापाचा स्फोट! संभाजीनगरमध्ये लाठीमार अन् हाणामारी, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Naregaon anti-encroachment Protest Today: नारेगाव येथे अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचा विरोध केला. पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना घटनास्थळावरून दूर हटवले. या कारवाईदरम्यान हाणामारी, धक्काबुक्कीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

Omkar Sonawane

  • छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा तणाव

  • जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रक पाहून स्थानिक नागरिक आक्रमक

  • कारवाईदरम्यान काही महापालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला

  • काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारेगाव परिसरात आज महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला नागरिकांनी जोरदार विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आलेल्या जेसीबी, ट्रॅक्टर आणि ट्रक पाहून स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनाने केवळ व्यावसायिक अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, तर राहिवासी अतिक्रमणावर काही दिवसांनी कारवाई केली जाईल, असे सांगूनही नागरिकांचा विरोध कायम राहिला.

मोहीम सुरू होताच काही नागरिकांनी आक्षेप नोंदवत प्रशासनासमोर घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तणाव वाढला आणि पोलिसांना हस्तक्षेप करत लाठीचार्ज करावा लागला. काही नागरिकांना घटनास्थळावरून दूर करण्यात आले. घटनेबाबत अधिक माहिती देताना डीसीपी प्रशांत स्वामी यांनी सांगितले की, अतिक्रमण विरोधात मोहिम राबवताना काही ठिकाणी नागरिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे आम्ही पोलिस बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.

दरम्यान, या कारवाईदरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांवर काही नागरिकांनी हल्ला केल्याचेही निदर्शनास आले असून, त्यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT