Chhava Saam Tv
Video

Nagpur Violence: छावा बघितल्यानंतर लोकांच्या भावानांचा उद्रेक झाला; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले, VIDEO

CM Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत नागपूरमध्ये झालेल्या दंगलीबाबत निवेदन दिले. यावेळी त्यांनी छावा चित्रपटाचा संदर्भ दिला.

Omkar Sonawane

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये काल काही समाजकंटकांनी पोलिसांना मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. तसेच उपायुक्त दर्जाच्या पोलिसांवर कुऱ्हाडीचा हल्ला करून नागपूरच्या महाल परीसारतल्या दुचाकी आणि चारचाकी वाहन देखील जाळले. तसेच क्रेन आणि जेसीबीला देखील पेटवून दिले. या सर्व प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देताना सांगितले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता मी आवाहन करतो, आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो. कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्याला देखील सोडले जाणार नाही. असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. तसेच फडणवीस पुढे म्हणाले, छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या. आणि औरंगाजेबाच्या प्रती लोकांचा राग निर्माण झाला आहे. परंतु महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वानी संयम बाळगला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT