Lasalgaon Muslim women preparing 2,500 bhakris to support Maratha protest at Azad Maidan, Mumbai. Saam Tv
Video

Maratha Protest: मुस्लिम महिलांचा पुढाकार! मराठा आंदोलनासाठी २,५०० भाकऱ्या बनवून दिल्या|VIDEO

Muslim Women Cook 2500 Bhakris For Maratha Protest: मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला लासलगावच्या मुस्लिम महिलांचा पाठिंबा दिलाय. तब्बल २,५०० भाकऱ्या बनवून आंदोलकांना दिल्या. सामाजिक ऐक्याचं सुंदर उदाहरण.

Omkar Sonawane

लासलगावच्या २० मुस्लिम महिलांनी तब्बल २,५०० भाकऱ्या तयार केल्या

भाकऱ्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनस्थळी नेण्यात आल्या

आंदोलनाला मुस्लिम बांधवांचा पाठिंबा मिळाल्याने सामाजिक ऐक्याचं दर्शन

मराठा आंदोलनाला मिळालेला हा पाठिंबा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरला

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचं आंदोलन सुरू असून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. काल लासलगाव येथून कार्यकर्ते आंदोलनस्थळी रवाना झाले. यासाठी खास भाकऱ्या आणि पोळ्या तयार करून नेण्यात आल्या. या भाकऱ्या तयार करण्यासाठी लासलगावमधील मुस्लिम महिलांनी पुढाकार घेतला. जवळपास २० मुस्लिम महिलांनी तब्बल २,५०० भाकऱ्या बनवून कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केल्या. या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचं दर्शन घडल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. मराठा समाजाच्या लढ्यात मुस्लिम बांधवांचाही सहभाग दिसून आल्याने आंदोलनाला एक वेगळाच संदेश मिळाल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Barfi Recipe: घरच्या घरी काही मिनिटांत तयार करा दुधाशिवाय टोमॅटो बर्फी, वाचा सोपी रेसिपी

Manoj Jarange Patil Protest Live Updates : पुण्यात गणरायासमोर ऑपरेशन सिंदूरचा देखावा

Anjali Raghav : "चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला..."; अंजली राघवने अभिनयाला रामराम ठोकला, पवन सिंहवर संतापली

Yawal Crime News : किरकोळ वादातून शस्त्राने वार करत हत्या; हत्येनंतर मारेकरी पोलिसात जमा

LPG ते आधार कार्ड अपडेट; १ सप्टेंबरपासून ८ नियमांमध्ये बदल, सामान्यांच्या खिशावर परिणाम

SCROLL FOR NEXT