CM Eknath Shinde on Saam Exclusive, Mumbai Traffic Issue Saam tv
Video

मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'साम'वर Exclusive

Eknath Shinde On Mumbai Traffic : मुंबईतील अत्यंत महत्वाच्या असा वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत व्यक्त केला.

Saam Tv

मुंबईकरांची आणि मुंबईत येणाऱ्या कोट्यवधी नोकरदार वर्गाला त्रासदायक ठरणाऱ्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

महामार्ग, मेट्रोमार्ग असे विविध प्रकल्प सध्या मुंबईसह राज्यात सुरू आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ड्रीम प्रोजेक्टबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'आमचं सरकार येण्याआधी सर्व कामे ठप्प होती. मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आदी सर्व प्रकल्पांना आमचं सरकार आलं तेव्हा चालना दिली. आम्ही मुख्यमंत्री वॉर रूमध्ये प्रकल्प घेतले. दररोज मॉनिटरिंग केलं. जनतेला अपेक्षित निर्णय देऊ शकलो.'

अटल सेतू तर गेमचेंजर प्रकल्प ठरला. समृद्धी महामार्ग, सागरी सेतू, मुंबई-पुणे मिसिंग लिंक हे देखील आहेत. मेट्रो प्रकल्पांची कामे टप्प्याटप्प्याने करत आहोत. पुढे जात आहोत. मेट्रो मार्ग महत्वाकांक्षी असून, तो पूर्ण करतोय. आज लाखो प्रवासी मेट्रोने जातात. मेट्रो ३ लवकरच सुरू करतोय. लाखो प्रवासी प्रवास करणार आहोत. बीकेसीतला महत्वाचा टप्पा असून, तोही लवकरच पूर्ण होईल. भविष्यात हे प्रकल्प पूर्ण होतील. त्यावेळी जास्त वाहने रस्त्यावर दिसणार नाहीत. लोक मेट्रोचा आरामदायी प्रवास करतील. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : विधीमंडळातील फुटीचे पडसाद मूळ पक्षात का उमटू शकत नाहीत?; न्यायमूर्ती बागचींच्या प्रश्नाने कोर्टात पुन्हा वाद पेटला

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Weight Loss: ट्रेडमिल की बाहेर चालणे? वजन कमी करण्यासाठी जाणून घ्या कोणता पर्याय ठरेल अधिक फायदेशीर

Beauty Tips : मानेवर चामखीळ किंवा तीळ घाण दिसतोय? या घरगुती उपायांनी करा कायमचा उपाय

Janhvi Kapoor: अश्लील फोटोप्रकरणी जान्हवी कपूरला हाय कोर्टाचा दिलासा; पण, फॅन पेजेस ब्लॉक करण्यास नकार

SCROLL FOR NEXT