Bhandup Saam TV
Video

Bhandup : पूर्व उपनगरात संततधार, भांडुप LBS रोडवर पाणीचं पाणी | VIDEO

LBS Road : मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासूनच संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.भांडुपमधील एलबीएस मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः भांडुप परिसरातील एलबीएस मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अद्याप मोठा परिणाम झालेला नसला तरी खाजगी वाहतूक आणि स्थानिक रस्त्यांवर कोंडीची स्थिती आहे.

सकाळच्या सुमारास चाकरमानी देखील कुठेतरी कामाच्या दिशेने निघाले होते मात्र जोरदार पावसामुळे चाकरमान्यांना देखील कामावर जाताना अडथळे निर्माण झाले आहेत. भांडूप, कुर्ला, मुलुंड आणि पवई या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या असून, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

Mahalaxmi Rajyog 2025: भूमिपुत्र मंगळ बनवणार पॉवरफुल योग; 'या' ३ राशींच्या व्यक्तींवर पडणार नोटांचा पाऊस

SCROLL FOR NEXT